ऍसिडिटी होणे म्हणजे खूप नॉर्मल बाब आहे. जेव्हा पोटातील जठरासंबंधी ग्रंथींद्वारे असिडच्या अत्यधिक उत्पादन होते तेव्हा ऍसिडिटी होते. ही समस्या सामान्यत छातीत जळजळ म्हणून ओळखली जाते.
पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो जो आपण खाल्लेल्या अन्नाचे पतन आणि पचन यासाठी आवश्यक असतो आणि शरीरासाठी नुकसानदाई जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंधित करतो.
*ऍसिडिटीची कारणे:* मानसिक ताण, जास्त तेलकट, मसालेदार आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन, गर्भधारणा, धूम्रपान आणि मद्यपान, पोटाचे आजार, शारीरिक हालचाल आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये अनियमितता या मुळे देखील ऍसिडिटी होऊ शकते. तसेच खलील औषधाने देखील ऍसिडिटी चा त्रास जाणवु शकतो👇🏼
Medicines for high blood pressure, Antibiotics, Depression and anxiety medications
लक्षणे:-
मळमळ, पोट किंवा घशात किंवा हृदयात जळजळ होणे, श्वासाची दुर्घंधी, गिळण्यात अडचण, अस्वस्थता, बद्धकोष्ठता, तोंडाला आंबट चव, अपचन अशी अनेक लक्षणे उद्भवतात.
उपाय:
नैसर्गिकरित्या ऍसिडिटी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एक ग्लास टरबूजचा रस किंवा नारळाचे पाणी. आपण आपल्या आहारात सलाद,केळी, काकडी किंवा दही देखील समाविष्ट करू शकता. ते आम्लतेसाठी त्वरित आराम प्रदान करतात.🙂
ऍसिडिटी वर कायम स्वरूपी उपाय पुढील पोस्टमध्ये...
अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती साठी लिंक वरून ग्रुप जॉईन करा.🙏🏽🙏🏽🙏🏽
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें