16 दिसंबर 2020

अनिल कपूर यांच्या तरुण दिसण्याचे रहस्य काय?

अनिल कपूर यांना एका मुलाखतीमध्ये त्यांच्या Young दिसण्याबद्दलचे रहस्य विचारले असता त्यांनी आरोग्याबद्दल खूप सारी उपयुक्त माहिती सांगितली,त्यांची ती मुलाखत काय होती ते आपण पाहू.

 'दील धड़कने दो' या आमच्या मल्टीस्टार चित्रपटाच्या शूटिंगसाठी कृझचा अर्धा भाग भाड्याने घेतला होता . क्रूझवरच खूपसं चित्रण झालं. सकाळी सात वाजता सुरू झालेलं शूटिंग संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण व्हायचं . पॅक अप झालं की संपूर्ण स्टारकास्ट दररोजच पार्टी करत असे . थोडी वाइन , अनेक विदेशी पदार्थांची रेलचेल , गप्पा - गोष्टी आणि डान्स अशी धमाल मस्ती केल्यावर तजेला येतो , असं मी सोडून प्रत्येकाचं मत होत ! मी रात्री १० वाजता माझ्या केबिनमध्ये गाढ झोपून जात असे ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच उठायचो. यावरून अनेकांनी चिडवलं, पण २ महिन्यांत माझं रुटीन कायम राहिलं, मी माझ्या शिस्तबद्ध जीवनाचा गुलाम आहे ! शिस्तबद्ध आयुष्य , वक्तशीर - नियोजनबद्ध व्यायाम हेच माझ्या फिटनेसचं रहस्य आहे . करिअरमध्ये माझ्यावर अनेकदा टीका झाली . पण मी टीका- नकारात्मकतेपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे . कारण *मन चंगा तो तन चंगा*! माझा तसा काही आगळा - वेगळा फिटनेस मंत्र नाही . पण माझी जीवनशैल मात्र नियमित आहे . मी ती काटेकोरपणे पाळतो . सकाळी ६ वाजता उठण्याचा माझा अनेक वर्षांचा परिपाठ आहे . सकाळी उठून मी १ लिटर पाणी पितो आणि १ केळी खातो अगदी दररोज, न चुकता. मग व्यायाम सुरू करतो. कधी योगासने , कधी आऊट डोअर व्यायाम , कधी जिम अशा प्रकारे व्यायामातही बदल आणल्याने मी कंटाळत नाही. त्यात सातत्य असतं.
 ब्रेकफास्टमध्ये सँडविच विथ व्हेजीस्- सॅलडची पाने, विविध सॉस, लेट्युस, एग व्हाइट, कधी ओट्स मिल, नाचणी लापशी, कधी मिल्क सीरियल्स तर कधी दलियाही असतात. दुपारच्या जेवणामध्ये बहुधा उकडलेल्या भाज्या खातो . ब्रोकोलीला विशेष पसंती असते माझी. सलाड असतात. आणि त्याआधी सूप मस्ट. शक्यतो मी भात आहारात घेत नाही,पण अधूनमधून ब्राऊन राइस आणि ३-४ डाळी उकडून केलेली डाळ त्यावर लिंबू हा मेनू मला आवडतो . कारण तो रुचकर आणि आरोग्यदायी आहे. रात्रीचे जेवण मी सात ते आठदरम्यान घेतो. ते असते सूप आणि सॅलड्सचे. आणि मी १० वाजता झोपण्यास जातो. अर्थात झोपण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून करतो ते म्हणजे रोजच्या आहारात मी किती कॅलरीज घेतल्या हे मी पाहतोच. जास्त घेणे जसे चुकीचे तसे कमी घेणेही. सामोसा, भजीसारखे तेलकट पदार्थ तर मी कित्येक वर्षात खाल्लेही नाहीत.

 https://chat.whatsapp.com/CEBc4ScPFSk23bpnXJFEJ7 अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती दररोज whats app वर मिळवण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.🙏

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें