06 दिसंबर 2019

Diabetes/शुगर

राक्षसी मधुमेह

सर्वांना मधुमेहाविषयी माहिती मिळावी हा या blog लिहण्यामागचा उद्देश.चला तर पाहूया मधुमेह म्हणजे काय
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह.
      दात, टाळू, गळा, जीभ अशा ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मल उत्पन्न होतो व  चिकटा आल्यासारखी जाणिव होते.  दात पिवळसर होतात. हातापायाच्या तळव्यांना आग होणे, टोचल्याप्रमाणे वेदना होणे इ. लक्षणे जाणवतात.  मेदोदोषांमुळे अधिक प्रमाणात मलोत्पत्ती होते. श्वास दूर्गंधी असणे, अति तहान लागणे अशी लक्षणे मधुमेह होण्यापूर्वी दिसून येतात.ही मधुमेह होण्यापूर्वीची लक्षणे.
लक्षणे-
वारंवार लघवीची भावना, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, मूत्रमार्गाची जळजळ, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. लघवीला मुंग्या लागल्या तर मधुमेह बळावला असे आपल्याला वृद्ध वैद्यांनी सांगितलेले असते.


मधुमेहाचे प्रकार
१.टाईप 1(IDD)
हा मधुमेह बहुतेकवेळा जन्मतः असतो किंवा अगदी लहान वयातच होतो. आई वडिलांकडून, बीजदोषामुळे हा पुढच्या पिढीत येतो. तुलनेने हा अधिक त्रासदायक असतो, ह्याची चिकित्साही कटकटीची असते. ह्यामध्ये रुग्ण अधिकतर इन्शुलिनवरच अवलंबून असतो. आई वडिलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बहुतांशी पुढच्या पिढीतही तो उद्भवतो. पण चिकित्सा, आहार, विहार, व्यायाम ह्यांची सुनियोजित सांगड घातली तर अगदी ऐन विशीत होणार असेल तर तो दहा बारा वर्षे तरी नक्कीच पुढे ढकलता येईल.
२.टाईप 2 (NIDD)हा मधुमेह सामान्यतः वयाच्या तिशी – पस्तीशी दरम्यान किंवा नंतरही होतो. चुकीचा आहार आणि जीवनपद्धती हे ह्या विकाराचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. औषध सेवनाने हा प्रकार नियंत्रणात राहू शकतो. मात्र योग्य चिकित्सा न केल्यास किंवा इतर पथ्यपाणी न सांभाळल्यास शेवटी इन्शुलिनवर अवलंबित गंभीर अशा टाईप १ प्रकारात जाऊ शकतो

मधुमेहाचे त्रास
यामध्ये हृद्यरोग, मज्जायंत्रणेचे (सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम) विकार, किडनी विकार, डोळ्यांचे विकार, पायांचे विकार, कानाचे दोष,  त्वचारोग, स्मृतिभ्रंश हे प्रमुख आजार संभवतात

मधुमेहाची कारणे काय आहेत ते आपण पाहू-
भरपूर आराम, जास्त झोप, दूध – दह्याचे पदार्थ, उसाचे पदार्थ, पाणथळ जागेतील प्राण्यांचे मांस, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे अशा कारणांमुळे मधुमेह होतो.
मधुमेहात पथ्यापथ्य –
भरपूर आराम, जास्त झोप, दुग्धजन्य पदार्थांचे अति सेवन, गोड पदार्थ, मांसाहार, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे ही मधुमेहाची कारणे आपण वर पाहिली. कोणत्याही रोगाची चिकित्सा करण्याचा कानमंत्र म्हणजे “रोग होण्याची कारणे टाळणे” त्याचबरोबर खालील उपाय करावे.
१.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत.
२. बेकरी पदार्थ घेऊ नये.
३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद.
४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ.
५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी.
६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम  न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर
७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास )
८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें