चहा चे दुष्परिणाम
दिवसभरात अधूनमधून चहाचा आनंद घेणारे बरेचजण असतात, पण बऱ्याचदा या चहाचे तब्येतीवर दुष्पपरिणाम होतात. ऑसिडीटीचा त्रास सुरू होतो आणि मग चहा पुरताच बंद करायची वेळ येते.
मुख्यत्वेकरून चहा हा सकाळीच प्यायला जातो. आपली सवय म्हणून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या चहामध्ये असणारे काही घटक जसे एल-थनाईन, थिओफिलिन आणि कॅफिन ही कॉफिच्या बियांमध्ये असणारी अल्कलॉईड द्रव्ये उत्तेजना देण्यास आणि हुशारी वाढवण्यास मदत करतात. परंतु हे घटक फक्त नैसर्गिक चहामध्येच असतात. बाजारात मिळणाऱ्या बर्याचश्या चहामध्ये हे गुणकारी घटक आढळत नाहीत.
त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसान सोसावे लागते.
म्हणून आपल्या शरीराला चहाचे काय दुष्परिणाम आहेत ते पुढीलप्रमाणे-
१.कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ कोर्या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा अन् उष्ण गुणाचा आहे.
५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासांत सर्वांनी चहा जपून अन् प्रमाणात प्यायला हवा.
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.
यासाठी पर्याय म्हणून आपण आयुर्वेदिक चहा वापरू शकतो.त्यामुळे आपल्या शरीराला कसलेही नुकसान होणार नाही उलट त्याचे फायदेच होतील.काही विचारवंत आणि तज्ज्ञांचे चहाबद्दल काय मते आहेत ते पाहू.
1.चहा प्यायल्याने पोटाच्या तक्रारी वाढत आहेत-डॉ.कार्तिकेय बोस
2.चहा कॉफीच्या सेवनाने रक्तदाब वाढतो-मरीय फिशबेन
3.चहा कॉफीने बुद्धीचा नाश होतो-स्वामी दयानंद सरस्वती
4.चहा प्यायल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात व मानसिक खिन्नता येते-डॉ.जे डब्लू मार्टिन.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें