06 दिसंबर 2019

Diabetes/शुगर

राक्षसी मधुमेह

सर्वांना मधुमेहाविषयी माहिती मिळावी हा या blog लिहण्यामागचा उद्देश.चला तर पाहूया मधुमेह म्हणजे काय
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह.
      दात, टाळू, गळा, जीभ अशा ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मल उत्पन्न होतो व  चिकटा आल्यासारखी जाणिव होते.  दात पिवळसर होतात. हातापायाच्या तळव्यांना आग होणे, टोचल्याप्रमाणे वेदना होणे इ. लक्षणे जाणवतात.  मेदोदोषांमुळे अधिक प्रमाणात मलोत्पत्ती होते. श्वास दूर्गंधी असणे, अति तहान लागणे अशी लक्षणे मधुमेह होण्यापूर्वी दिसून येतात.ही मधुमेह होण्यापूर्वीची लक्षणे.
लक्षणे-
वारंवार लघवीची भावना, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, मूत्रमार्गाची जळजळ, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. लघवीला मुंग्या लागल्या तर मधुमेह बळावला असे आपल्याला वृद्ध वैद्यांनी सांगितलेले असते.


मधुमेहाचे प्रकार
१.टाईप 1(IDD)
हा मधुमेह बहुतेकवेळा जन्मतः असतो किंवा अगदी लहान वयातच होतो. आई वडिलांकडून, बीजदोषामुळे हा पुढच्या पिढीत येतो. तुलनेने हा अधिक त्रासदायक असतो, ह्याची चिकित्साही कटकटीची असते. ह्यामध्ये रुग्ण अधिकतर इन्शुलिनवरच अवलंबून असतो. आई वडिलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बहुतांशी पुढच्या पिढीतही तो उद्भवतो. पण चिकित्सा, आहार, विहार, व्यायाम ह्यांची सुनियोजित सांगड घातली तर अगदी ऐन विशीत होणार असेल तर तो दहा बारा वर्षे तरी नक्कीच पुढे ढकलता येईल.
२.टाईप 2 (NIDD)हा मधुमेह सामान्यतः वयाच्या तिशी – पस्तीशी दरम्यान किंवा नंतरही होतो. चुकीचा आहार आणि जीवनपद्धती हे ह्या विकाराचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. औषध सेवनाने हा प्रकार नियंत्रणात राहू शकतो. मात्र योग्य चिकित्सा न केल्यास किंवा इतर पथ्यपाणी न सांभाळल्यास शेवटी इन्शुलिनवर अवलंबित गंभीर अशा टाईप १ प्रकारात जाऊ शकतो

मधुमेहाचे त्रास
यामध्ये हृद्यरोग, मज्जायंत्रणेचे (सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम) विकार, किडनी विकार, डोळ्यांचे विकार, पायांचे विकार, कानाचे दोष,  त्वचारोग, स्मृतिभ्रंश हे प्रमुख आजार संभवतात

मधुमेहाची कारणे काय आहेत ते आपण पाहू-
भरपूर आराम, जास्त झोप, दूध – दह्याचे पदार्थ, उसाचे पदार्थ, पाणथळ जागेतील प्राण्यांचे मांस, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे अशा कारणांमुळे मधुमेह होतो.
मधुमेहात पथ्यापथ्य –
भरपूर आराम, जास्त झोप, दुग्धजन्य पदार्थांचे अति सेवन, गोड पदार्थ, मांसाहार, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे ही मधुमेहाची कारणे आपण वर पाहिली. कोणत्याही रोगाची चिकित्सा करण्याचा कानमंत्र म्हणजे “रोग होण्याची कारणे टाळणे” त्याचबरोबर खालील उपाय करावे.
१.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत.
२. बेकरी पदार्थ घेऊ नये.
३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद.
४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ.
५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी.
६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम  न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर
७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास )
८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम.

09 जुलाई 2019

चहा पिताय? सावधान !!!

चहा चे दुष्परिणाम


दिवसभरात अधूनमधून चहाचा आनंद घेणारे बरेचजण असतात, पण बऱ्याचदा या चहाचे तब्येतीवर दुष्पपरिणाम होतात. ऑसिडीटीचा त्रास सुरू होतो आणि मग चहा पुरताच बंद करायची वेळ येते.
मुख्यत्वेकरून चहा हा सकाळीच प्यायला जातो. आपली सवय म्हणून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या चहामध्ये असणारे काही घटक जसे एल-थनाईन, थिओफिलिन आणि कॅफिन ही कॉफिच्या बियांमध्ये असणारी अल्कलॉईड द्रव्ये उत्तेजना देण्यास आणि हुशारी वाढवण्यास मदत करतात. परंतु हे घटक फक्त नैसर्गिक चहामध्येच असतात. बाजारात मिळणाऱ्या बर्याचश्या चहामध्ये हे गुणकारी घटक आढळत नाहीत.
त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसान सोसावे लागते.
म्हणून आपल्या शरीराला चहाचे काय दुष्परिणाम आहेत ते पुढीलप्रमाणे-
१.कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा अन् उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासांत सर्वांनी चहा जपून अन् प्रमाणात प्यायला हवा.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.

यासाठी पर्याय म्हणून आपण आयुर्वेदिक चहा वापरू शकतो.त्यामुळे आपल्या शरीराला कसलेही नुकसान होणार नाही उलट त्याचे फायदेच होतील.काही विचारवंत आणि तज्ज्ञांचे चहाबद्दल काय मते आहेत ते पाहू.
1.चहा प्यायल्याने पोटाच्या तक्रारी वाढत आहेत-डॉ.कार्तिकेय बोस
2.चहा कॉफीच्या सेवनाने रक्तदाब वाढतो-मरीय फिशबेन
3.चहा कॉफीने बुद्धीचा नाश होतो-स्वामी दयानंद सरस्वती
4.चहा प्यायल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात व मानसिक खिन्नता येते-डॉ.जे डब्लू मार्टिन.

11 मार्च 2019

तंबाखूचे व्यसन आरोग्याचे शोषण

 हानिकारक तंबाखू
धूर जसा हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत जातो तसेच आपल्या भारतात तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पसरत चालली आहे.अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या व्यसनाच्या आहारी जात आहेत.म्हणूनच आज आपण तंबाखूचे दुष्परिणाम पाहू.
तंबाखूमुळे कँसर (कर्करोग) होऊ शकतो
तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.
भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे.
भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्‍सर आणि इतर कँसर होण्‍याचे कारण धूम्रपान आहे.
तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार),पायाचा गैंग्रीन हे रोग होतात.
धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.
ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते.
तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहचवते.
मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्‍या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. धूम्रपान न करणारा पण २ पाकिट रोज धूम्रपान करणा=या बरोबर राहिल्यास, न करणा-यास रोज ३ पाकिट धूम्रपान करणा-या इतका त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले.



तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते.
धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणा-यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका 2 ते 3 पट अधिक वाढतो.
भारतात, तंबाखू संबंधित मृत्‍युची एकूण संख्या दर वर्षी 800000 (8 लाख) ते 900000 (9 लाख) इतकी असेल.
तंबाखूपासून दूर राहिल्यास एक किशोर/किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षाने वाढू शकेल.
भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे.
तंबाखू व धूम्रपान याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे व स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते.
धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.
ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.

तंबाखू सोडण्याचे फायदे-
- शारीरिक फायदे
तुमच्यातील कँसर वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात.
हदयावर येणारा दाब कमी होतो.
तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर होणार नाही.
तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला नाहीसा होईल.
तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.
-सामाजिक फायदे
तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही.
तुमची आत्‍म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल.
आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक बनाल.
तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.
धूम्रपान सोडण्यासाठी कधी ही उशीर झालेला नसतो
धूम्रपान/तंबाखू सोडणे वा थांबवणे हे वयाच्या मध्यान्हात कर्करोग होण्यापूर्वी देखील होवू शकते किंवा तंबाखूमुळे इतर भयंकर रोग बळावण्या आधी, जेणेकरुन भविष्यातली मरणाची भीती नाहीशी होईल.
किशोर अवस्थेत सोडल्यास त्याचे फायदे जास्त पहायला मिळतात.
तुम्‍ही एकदा का तंबाखूचे सेवन थांबवले की हदयविकाराचा धोका ३ वर्षात तंबाखूचे सेवन न करणा-यासारखा सामान्य होतो.

जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा ४ गोष्टी लक्षात ठेवा
१.आपल्या सोबत खडीसाखर ठेवा व थोडी थोडी खात जा.
२. दोन सिगरेट पिण्यामध्ये विलम्ब करा
३. दीर्घ श्वास घ्या.             
४. पाणी प्या
स्‍वतःसाठी सकारात्मक बोला
स्वतःला पुरस्कृत करा.
दररोज योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी गोष्टी तंबाखू सोडण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात.
या व्यतिरिक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार घ्या !