आरोग्याचा शत्रू अनिद्रा
रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.
झोपण्याची योग्य पद्धत-
-चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा.
-झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे
-पश्चिम किंवा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो.
-झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.
निद्रानाशाचे परिणाम-
निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे,डोके जड पडणे,शरीर जड पडणे,अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात.त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे.
अपुरी झोप (गरजेपेक्षा कमी, जास्त वा अयोग्य) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.
आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.
शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे फायदे :-
1)चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते,त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.
2)व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.
3)सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
4)चेहऱ्यावरील डाग कमी होतात : लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.
5) ब्लड ग्लुकोज कमी होत नाही: पुरेशा झोपेचा परिणामामुळे hypoglycaemia चा त्रास पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.
6) भूकेत सुधारणा होते : पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.
7) मायग्रेनचा त्रास कमी होतो : पुरेशी झोप घेतल्याने कमी खाणे, जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवत नाही.
8) कार्यक्षमतेत वाढ होते : ८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते.
9) पुरेशी झोप घेतल्यानुळे आपले concentration वाढण्यास मदत होते.व अभ्यास केलेला लक्षात राहू लागतो.
अशा प्रकारे योग्य,व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते.म्हणूनच तर जेवण,व्यायाम,योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

nice
जवाब देंहटाएंGreat info it is really useful in daily routine.
जवाब देंहटाएं