हे पदार्थ कधीही सोबत खाऊ नये . वाचा पूर्ण लेख
आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष राहणे आवश्यक आहे. कारण आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे एकापाठोपाठ एक अतिखाल्ल्यास किंवा विरुदध गुणधर्माचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. यालाच आयुर्वेदात ' विरुद्ध आहार' म्हणतात.
आरोग्याची काळजी घेणे ही बदलत्या काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे, म्हणूनच विरुद्ध आहार वर्गीकरण लक्षात घेणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. पदार्थ शुद्ध सात्त्विकता संपन्न असेल आणि तो त्याच्या विरुद्ध पदार्थांसमवेत सेवन करण्यात आला तरी शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतो.
गरमागरम भोजनानंतर लगेच आईस्क्रिम खाणे योग्य नाही , द्विदल डाळी सोबत दही खाणे योग्य नाही, दही मीठ एकत्र खाणे योग्य नाही, कोणतेही दोन वेगवेगळे पदार्थ सेवन करताना ज्यांचे गुणदोष एकमेकांच्या विरुद्ध आहेत त्या पदार्थांना एक साथ कधीही सेवन करू नये. कांदा – दूध एक साथ कधीच खाऊ नये ज्यामुळे कमीत कमी 20 प्रकारचे आजार होण्याचा धोका संभवतो, जसे की सोरायसिस, एग्जिमा, त्वचेला खाज,इ., फणस आणि दूध देखील एकत्र खाऊ नये कारण फणसामध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असते व ते पचविण्यासाठी ते स्पेशल खाल्ले पाहिजे, दूध आणि आंबट फळ किंवा त्या फळांचा रस एकत्र प्राशन करू नये, जसे कि संत्री,मोसंबी, द्राक्षे, ई. पिकलेल्या आंब्यासोबत दूध खाऊ शकता, चिकू आणि केळी दुधात खाऊ शकता.
आवळा सोडला तर देवाने दिलेल्या कोणत्याही आंबट फळासोबत दूध खाऊ नये, कच्या आंब्या सोबत दूध खाऊ नये, उडीदडाळ आणि दही एक साथ खाऊ नये, सलग सहा ते आठ महिने उडीदडाळ आणि दही एक साथ सेवन केल्यास हृदय घात सारख्या घातक परिणामाला सामोरे जावे लागते. उडीद वडा आणि दही खाण्याऐवजी उडीद वडा आणि चटणी खाणे योग्य आहे. मध आणि तूप एकत्र एकत्र खाणे हे जगातील खराब विष आहे. काही ठिकाणी मध आणि तुपामध्ये गोमूत्र किंवा गोमयरस मिसळून नवजात बाळाला दिले जाते ते योग्य नाही, तर बाळाला शुद्ध मध किंवा गोमातेचे सात्विक तूप चटण्यास दिले पाहिजे. कधी जर बाळाचा जन्मताच रंग बदलत असेल, विष प्रयोगाप्रमाणे फरक जाणवत असेल तर
आयुर्वेदिक चिकित्सकाच्या सल्ल्याने बाळाला मद आणि तूप एकत्र देणे योग्य ठरेल.
दूध-दही, कडी-खीर एकत्र खाऊ नये, केमिकल विरहित शुद्ध गुळ आणि शुद्ध मध एकत्र खाल्ला पाहिजे, दोन परस्पर विरुद्ध आहारामध्ये कमीत कमी दीड तासाचे अंतर असावे. दह्यामध्ये मीठ टाकून खाऊ नये, दह्यास जीवाणूसाठी खाल्ले जाते दही हा पदार्थ करोडो जीवाणूंचे घर आहे, त्यामध्ये मिठ टाकल्यास जीवाणू मरण पावतात आणि मग दही खाण्यासाठी काही कारण उरतच नाही. वांग आणि चपाती, ताक आणि दूध, लसूण आणि दूध, कच्चा मुळा आणि दूध, तसेच थंड आणि गरम पदार्थ, जुने आणि नवीन पदार्थ, कच्चे आणि पिकलेले पादार्थ कधीही एकत्र खाऊ नये.
* विरुद्ध आहाराचे दुष्परिणाम : त्वचा रोग,गळू, ताप, रक्तपित्त, वाताचे विकार, मूतखडा, मधुमेह, जलोदर, मूळव्याध, त्वचेवर फोड येणे, सूज येणे, तसेच स्मरणशक्ती, बुद्धी, शरीरतेज, मन, यांवर देखील विपरित परिणाम होतो.

Good information Dr sumit
जवाब देंहटाएंNice dr.Sumit👌👌👌✌️✌️
जवाब देंहटाएंLai bhari Dr.Sumit
जवाब देंहटाएंMst Dr Sumit
जवाब देंहटाएंThanks to all
जवाब देंहटाएंMast
जवाब देंहटाएं