29 जून 2018

पावसाळ्यातील काळजी

पावसाळ्यातील आजार,उपाय व काळजी

पावसाळा म्हणजे अनेक विकार होण्याचा ऋतू थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टर चा कमाईचा सिजन😂 विनोदाचा भाग सोडा,चला तर पाहुयात पावसाळ्यातील विकार कसे टाळता येतील.
पावसाळयात अनेक विकार व आजार माणसाला होतात.पहिला पाऊस पडला की तो सर्वांनाच तृप्त करणारा असतो,पण जसे जसे आभाळ येईल तसे तसे अनेकांचे सांधे जखडायला सुरवात होते.दमा असलेल्या रुग्णांची तर पहाटेची झोपच पळून जाते.
पावसाळ्यात अपचनाचे त्रास उद्भवतात,तसेच सर्दी,खोकला,व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप,कावीळ इ.च्या साथी पसरतात.गुडघे दुखी,पाठ दुखी,सांधे दुखी सायटिका वगैरे वातविकार ही डोके वर काढतात.तसेच निरुत्साह,थजवा,मरगळ असतेच.
असे होन्याचे नेमके कारण तरी काय पावसाळ्यात दमटपणा त्यामुळे इन्फेकॅशनला मिळणारा वाव दूषित पाणी ही सगळी कारणे तर असतातच पण बरोबरीने पावसाळ्यात पचनशक्ती खालावते,शरीर शक्ती सर्वात कमी होते आणि उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या गरम वाफामुळे शरीरात पित्तदोष साठण्यास सुरुवात होते.

या सर्वांचा प्रतिबंध करायचा असेल तर पुढील उपाय करायलाच हवेत.👇
1)प्यायचे पाणी उकळून घ्यावे.
  किमान दहा मिनिट तरी पाणी उकळावे आणि त्यामध्ये एक लहान सुंठेचा तुकडा टाकला तर उत्तमच.
2)रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप करावा,जंतूंच्या प्रतिकारासाठी हा चांगला उपाय आहे.म्हणून तर पूर्वीच्या काळी यज्ञ करत असत.
3)मंद झालेल्या पचन शक्ती साठी भुकेचा विचार करून सहज पचेल असेच अन्न खावे.
4)अन्न ताजे शक्यतो गरम असतानाच खावे.
5)रात्री मुगाची खिचडी,भात,पालकाचे सूप,रव्याचा पातळ शिरा असा सहज पचेल असा आहार घ्यावा.
6)भजी,समोसा,बटाटावडा असे जास्त तेल असलेले पदार्थ टाळावेत.
7)पचायला जड असलेल्या वस्तू खाणे टाळावे.
8)जेवणात आले खोबरे या पासून बनलेली चटणी असू द्या.
9)जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मिठासोबत चोखुन खा.
10)घशामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर कपभर गरम पाण्यात दोन तीन चिमूट हळद व दोन चिमूट मीठ टाकून गुळण्या कराव्या.
11)जुलाब होत असल्यास सकाळ संध्याकाळ आल्या-लिंबाचा रस घ्यावा.
12)गुडघे दुखी कंबर दुखी असणाऱ्यांनी वातशामक अशा आयुर्वेदिक तेलाने मालिश करावी.
 अशा प्रकारे आहार,आचरनात आवश्यक बदल,घरच्या घरी किंवा बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती चा वापर करावा.यावरून आपण पावसाळयासारख्या ऋतूतील आजारावर सहज मात करू शकतो.☺️
धन्यवाद.

1 टिप्पणी: