पाणी कसे प्यावे
नमस्कार मित्रांनो पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.पाण्याविना माणूस जगू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे.पण पाणी योग्य पद्धतीने घेतले तर पाण्यामुळे आपले आयुष्य वाढते हे खूप जणांना माहीत नसेल चला तर आज आपण पाणी कसे,कधी व किती प्यावे याबद्दल माहिती घेऊयात.वेळेनुसार पाण्याचा वापर
पाणी पिण्यासाठी वेळ कोणती असावी हे आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
1)सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे.
यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
2)पाणी व जेवण
आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे.जेवण केलेल्यानंतर आपल्या जठरामध्ये मंदग्नी तयात झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते.जेवण झाल्या झाल्या आपन पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अडचण निर्माण होते.व अन्न पचण्याऐवजी सडते त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात.त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी पिले पाहिजे.तसेच पाणी जेवण अगोदर ही पिणे योग्य नाही जेवनाअगोदर अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.
3)रात्री झोपताना देखील पाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे,रात्री झोपताना पाण्या ऐवजी दूध उत्तम असते.म्हणून रात्री पाणी कमि प्रमानात प्यावे.
आता आपण पाहुयात पिण्यायोग्य पाणी म्हणजे नेमके काय व कसे पाणी पिल्याने आपल्या शरीराला फायदा होतो.
1)पाणी नेहमी उकळून प्यावे.हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे.पावसाळ्यात ऋतू बदल झाल्यामुळे सर्दी,ताप,कावीळ यांच्या साथ पसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.
२)थंड पाणी हे शरीराला हानीकारक असते.
3)थोडेसे गरम केलेले पाणी शरीराला केव्हाही चांगले.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.व पोट साफ राहते.
4)सकाळी पाणी पीत असताना त्यामध्ये लिंबू टाकून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
5)पाणी पिण्यास गडबड अजिबात करू नये पाणी एकदम हळू हळू प्यावे.
6)हळू हळू व घोट घोट पाणी पिल्याने डायबीटीज(शुगर) होण्यापासून माणूस वाचू शकतो.
म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पचनसंस्था सुधारते व त्यामुळे आपले आयुष्य वाढते.☺️
या पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर शरीराला फायदे आहेत हे आपण वाचले.आता पुढच्या blog मध्ये आपण पावसाळ्यातील उपाय योजना पाहणार आहोत.धन्यवाद
https://chat.whatsapp.com/L5LXjxQxoxGKrcKPH2mYVN
Whatsapp वर आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करून group जॉईन करा.


Mast khup mast aaj pasun mi hi Pani pinya chi paddhat badlat ahe.
जवाब देंहटाएंAni ti ata pasun yogya tya paddhtina asel