मोबाईल संगणक आणि डोळे.
मोबाईल आणि संगणक आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग बनले आहेत.पूर्वी फक्त मोठ्या मोठ्या ऑफिस मध्ये व मोठ्या लोकांकडेच मोबाईल व संगणक असे,आता मात्र घराघरात संगणक व प्रत्येकाकडे मोबाईल आहेत.जास्त मोबाईल चा वापर केल्यामुळे डोळ्यांची आग होणे ,पाणी येणे ,डोळे थकने,डोके व डोळे दुखणे,डोळे कोरडे पडणे असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो.यापैकी कोणताही त्रास होत असल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांना जरूर दाखवावे.
एकाच अंतरावर सतत नजर स्थिर ठेवणे व बऱ्याच वेळ डोळ्यांची उघड झाप न होणे हे दोन मुख्य प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत.
स्क्रीन वर सतत नजर ठेवल्यामुळे डोळ्यांचे स्नायू अवघडतात.डोळे दुखू लागतात.हे टाळण्यासाठी दर 10-15 मिनिटांनी नजर स्क्रीन पासून हटवावी व वेगवेगळ्या अंतराच्या वस्तू बघाव्यात.उदाहरणार्थ खिडकी,त्यातून दिसणारे एखादे लांबचे झाड,भिंतीवरचे कॅलेंडर इत्यादी.त्यामुले हालचाल होते व ते लवचिक राहतात.
कोरडेपणा टाळण्यासाठी डोळ्यांची उघडझाप नियमितपणे करणे आवश्यक आहे.पुरेशी उघड झाप करूनही जर डोळे कोरडे पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्व साधारण कॉम्पुटर वर काम करताना काय काळजी घ्यावी हे आपण पाहू.
1)मोबाईल वापरताना तो डोळ्यांपासून लांब धरलेला असावा.
2)मोबाईल किंवा संगणकाचा Brightness कमी असावा.
3)कॉम्पुटर थोडा खाली झुकलेला असावा ज्यामुळे डोळे खाली झुकलेले राहतील.
4)डोळ्यांवर AC च्या हवेचा प्रत्यक्ष झोत येऊ नये.
5)वारंवार डोळ्याची उघड झाप करावी.त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवणार नाही.
6)दर 10 ते 15 मिनिटांनी नजर मोबाईल वरून हटवून इकडे तिकडे बघावे.
7)डोळे बंद करून सर्वत्र फिरवावे.
8)चष्म्या असल्यास त्याचा अवश्य वापर करावा.Anti-Reflective असेल तर उत्तमच.
इत्यादी काळजी घेतली तर डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवता येते.



Ek no doctor
जवाब देंहटाएंSuch a very useful information
जवाब देंहटाएंNice
जवाब देंहटाएंmast
जवाब देंहटाएंmast
जवाब देंहटाएंChan Mahiti ahe
जवाब देंहटाएं👌👌👌 keep it up bro
जवाब देंहटाएंThanks to all
जवाब देंहटाएं