30 जुलाई 2018

मोबाईल संगणक आणि डोळे.

 मोबाईल संगणक आणि डोळे.

मोबाईल आणि संगणक आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग बनले आहेत.पूर्वी फक्त मोठ्या मोठ्या ऑफिस मध्ये व मोठ्या लोकांकडेच मोबाईल व संगणक असे,आता मात्र घराघरात संगणक व प्रत्येकाकडे मोबाईल आहेत.
    जास्त मोबाईल चा वापर केल्यामुळे डोळ्यांची आग होणे ,पाणी येणे ,डोळे थकने,डोके व डोळे दुखणे,डोळे कोरडे पडणे असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो.यापैकी कोणताही त्रास होत असल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांना जरूर दाखवावे.
एकाच अंतरावर सतत नजर स्थिर ठेवणे व बऱ्याच वेळ डोळ्यांची उघड झाप न होणे हे दोन मुख्य प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत.
स्क्रीन वर सतत नजर ठेवल्यामुळे डोळ्यांचे स्नायू अवघडतात.डोळे दुखू लागतात.हे टाळण्यासाठी दर 10-15 मिनिटांनी नजर स्क्रीन पासून हटवावी व वेगवेगळ्या अंतराच्या वस्तू बघाव्यात.उदाहरणार्थ खिडकी,त्यातून दिसणारे एखादे लांबचे झाड,भिंतीवरचे कॅलेंडर इत्यादी.त्यामुले हालचाल होते व ते लवचिक राहतात.
कोरडेपणा टाळण्यासाठी डोळ्यांची उघडझाप नियमितपणे करणे आवश्यक आहे.पुरेशी उघड झाप करूनही जर डोळे कोरडे पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कॉम्पुटरच्या स्क्रीन पासून काही किरण डोळ्यांवर येतात व डोळे खराब होतात असे अजून तरी कुठेही सिद्ध झालेले नाही.कॉम्पुटर वापरल्याने चष्म्या लागतो हा एक चुकीचा समज आहे.फक्त डोळ्यांना पूर्वीपासूनच नंबर आहे हे लक्षात येते,पूर्वी काही त्रास नसल्यामुळे नंबर आहे हे लक्षात येत नाही.डोळ्यांना चष्म्याचा जरासा देखील नंबर असेल तर तो मोबाईल व संगणकामुळे लक्षात येते.

सर्व साधारण कॉम्पुटर वर काम करताना काय काळजी घ्यावी हे आपण पाहू.
1)मोबाईल वापरताना तो डोळ्यांपासून लांब धरलेला असावा.
2)मोबाईल किंवा संगणकाचा Brightness कमी असावा.
3)कॉम्पुटर थोडा खाली झुकलेला असावा ज्यामुळे डोळे खाली झुकलेले राहतील.
4)डोळ्यांवर AC च्या हवेचा प्रत्यक्ष झोत येऊ नये.
5)वारंवार डोळ्याची उघड झाप करावी.त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवणार नाही.
6)दर 10 ते 15 मिनिटांनी नजर मोबाईल वरून हटवून इकडे तिकडे बघावे.
7)डोळे बंद करून सर्वत्र फिरवावे.
8)चष्म्या असल्यास त्याचा अवश्य वापर करावा.Anti-Reflective असेल तर उत्तमच.
इत्यादी काळजी घेतली तर डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवता येते.

14 जुलाई 2018

औषधाचा सुरक्षित वापर

               औषधाचा सुरक्षित वापर


औषधे वापरताना काय काळजी घ्यायला हवी?औषधे विकत घेताना नेमकी कोणती माहिती आपल्याला असायला हवी याबद्दल आपण माहिती घेऊ.
आजकालच्या पळापळीच्या जीवनात औषधे आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य घटक बनली आहेत.पण याबद्दल आपणास किती माहिती असते?औषध हे जर योग्य तर्हेने वापरले गेले नाही तर ते घातक ही ठरू शकते.आपण औषध बघतो तेंव्हा सर्वप्रथम दिसते कव्हर.त्या कव्हर वर नेमके काय पहावे कुठे पाहावे,त्यावरील के मजकूर वाचावा हे आपण माहीत करून घेने खुप गरजेचे आहे.औषधे ही पाच प्रकारची असतात.
1)पहिले म्हणजे जी औषधे आपण तोंडातून घेतो या मध्ये गोळ्या,कॅप्सूल व पातळ औषध यांचा समावेश होतो.या प्रकारातील औषधे आपण जास्त प्रमाणात वापरतो
2)त्वचेवर लावण्यासाठी मलम तसेच लोशन.
3)इंजेक्शन
4)एअरोझोल्स म्हणजेच नाकाने हुंगुण घ्यायची औषधे.


 औषधे कशी वापरावीत याबद्दल सूचना व उपाय
औषधावरील कव्हरवर लिहलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.
(1)औषधावरील नाव व डॉक्टरांनी लिहून दिलेलं नाव एकच आहे ना?
(2)औषधाचे पॅकिंग व्यवस्थित आहे का हे तपासावे,ते फुटलेले असू नये.
(3)औषधाची expiry date तपासून घ्यावी
(4)औषधावरील बॅच नं.तपासून घ्यावा.
(5)आपण घेतलेल्या गोळ्यांचा आवश्यक परिणाम नाही दिसला तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करावा.
(6)शक्यतो सुट्ट्या गोळ्या घेणे टाळावे,पण जर वेळ पडलीच तर स्वछता बाळगली जावी याची काळजी घ्यावी.
(7)औषधाची वेळ चुकवू नये औषधे वेळेवर घेतल्याने त्याचा फायदा होतो.औषध डॉक्टरांचा सांगण्यावरून जेवना अगोदर जेवना नंतर जसे सांगितले आहे तसे घ्यावे.
(8)शेवटचा पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः स्वतःचे डॉ.होऊ नका एकाला लागू पडेल म्हणून दुसऱ्याला ही तेच औषध लागू पडेल असे नसते,डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे चुकीचे असते,यामुळे अनेक दूरगामी व गंभीर परिणाम होवू शकतात.