29 जून 2018

पावसाळ्यातील काळजी

पावसाळ्यातील आजार,उपाय व काळजी

पावसाळा म्हणजे अनेक विकार होण्याचा ऋतू थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टर चा कमाईचा सिजन😂 विनोदाचा भाग सोडा,चला तर पाहुयात पावसाळ्यातील विकार कसे टाळता येतील.
पावसाळयात अनेक विकार व आजार माणसाला होतात.पहिला पाऊस पडला की तो सर्वांनाच तृप्त करणारा असतो,पण जसे जसे आभाळ येईल तसे तसे अनेकांचे सांधे जखडायला सुरवात होते.दमा असलेल्या रुग्णांची तर पहाटेची झोपच पळून जाते.
पावसाळ्यात अपचनाचे त्रास उद्भवतात,तसेच सर्दी,खोकला,व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप,कावीळ इ.च्या साथी पसरतात.गुडघे दुखी,पाठ दुखी,सांधे दुखी सायटिका वगैरे वातविकार ही डोके वर काढतात.तसेच निरुत्साह,थजवा,मरगळ असतेच.
असे होन्याचे नेमके कारण तरी काय पावसाळ्यात दमटपणा त्यामुळे इन्फेकॅशनला मिळणारा वाव दूषित पाणी ही सगळी कारणे तर असतातच पण बरोबरीने पावसाळ्यात पचनशक्ती खालावते,शरीर शक्ती सर्वात कमी होते आणि उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या गरम वाफामुळे शरीरात पित्तदोष साठण्यास सुरुवात होते.

या सर्वांचा प्रतिबंध करायचा असेल तर पुढील उपाय करायलाच हवेत.👇
1)प्यायचे पाणी उकळून घ्यावे.
  किमान दहा मिनिट तरी पाणी उकळावे आणि त्यामध्ये एक लहान सुंठेचा तुकडा टाकला तर उत्तमच.
2)रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप करावा,जंतूंच्या प्रतिकारासाठी हा चांगला उपाय आहे.म्हणून तर पूर्वीच्या काळी यज्ञ करत असत.
3)मंद झालेल्या पचन शक्ती साठी भुकेचा विचार करून सहज पचेल असेच अन्न खावे.
4)अन्न ताजे शक्यतो गरम असतानाच खावे.
5)रात्री मुगाची खिचडी,भात,पालकाचे सूप,रव्याचा पातळ शिरा असा सहज पचेल असा आहार घ्यावा.
6)भजी,समोसा,बटाटावडा असे जास्त तेल असलेले पदार्थ टाळावेत.
7)पचायला जड असलेल्या वस्तू खाणे टाळावे.
8)जेवणात आले खोबरे या पासून बनलेली चटणी असू द्या.
9)जेवणाच्या अगोदर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मिठासोबत चोखुन खा.
10)घशामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर कपभर गरम पाण्यात दोन तीन चिमूट हळद व दोन चिमूट मीठ टाकून गुळण्या कराव्या.
11)जुलाब होत असल्यास सकाळ संध्याकाळ आल्या-लिंबाचा रस घ्यावा.
12)गुडघे दुखी कंबर दुखी असणाऱ्यांनी वातशामक अशा आयुर्वेदिक तेलाने मालिश करावी.
 अशा प्रकारे आहार,आचरनात आवश्यक बदल,घरच्या घरी किंवा बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती चा वापर करावा.यावरून आपण पावसाळयासारख्या ऋतूतील आजारावर सहज मात करू शकतो.☺️
धन्यवाद.

24 जून 2018

पाणी कसे प्यावे

पाणी कसे प्यावे

नमस्कार मित्रांनो पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.पाण्याविना माणूस जगू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे.पण पाणी योग्य पद्धतीने घेतले तर पाण्यामुळे आपले आयुष्य वाढते हे खूप जणांना माहीत नसेल चला तर आज आपण  पाणी कसे,कधी व किती प्यावे याबद्दल माहिती घेऊयात.

वेळेनुसार पाण्याचा वापर
पाणी पिण्यासाठी वेळ कोणती असावी हे आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
1)सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे.
यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
2)पाणी व जेवण
आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे.जेवण केलेल्यानंतर आपल्या जठरामध्ये मंदग्नी तयात झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते.जेवण झाल्या झाल्या आपन पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अडचण निर्माण होते.व अन्न पचण्याऐवजी सडते त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात.त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी पिले पाहिजे.तसेच पाणी जेवण अगोदर ही पिणे योग्य नाही जेवनाअगोदर अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.
3)रात्री झोपताना देखील पाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे,रात्री झोपताना पाण्या ऐवजी दूध उत्तम असते.म्हणून रात्री पाणी कमि प्रमानात प्यावे.

आता आपण पाहुयात पिण्यायोग्य पाणी म्हणजे नेमके काय व कसे पाणी पिल्याने आपल्या शरीराला फायदा होतो.
1)पाणी नेहमी उकळून प्यावे.हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे.पावसाळ्यात ऋतू बदल झाल्यामुळे सर्दी,ताप,कावीळ यांच्या साथ पसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.
२)थंड पाणी हे शरीराला हानीकारक असते.
3)थोडेसे गरम केलेले पाणी शरीराला केव्हाही चांगले.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.व पोट साफ राहते.
4)सकाळी पाणी पीत असताना त्यामध्ये लिंबू टाकून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
5)पाणी पिण्यास गडबड अजिबात करू नये पाणी एकदम हळू हळू प्यावे.
6)हळू हळू व घोट घोट पाणी पिल्याने डायबीटीज(शुगर) होण्यापासून माणूस वाचू शकतो.
म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पचनसंस्था सुधारते व त्यामुळे आपले आयुष्य वाढते.☺️
या पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर शरीराला फायदे आहेत हे आपण वाचले.आता पुढच्या blog मध्ये  आपण पावसाळ्यातील उपाय योजना पाहणार आहोत.धन्यवाद
https://chat.whatsapp.com/L5LXjxQxoxGKrcKPH2mYVN
 
Whatsapp वर आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करून group जॉईन करा.

17 जून 2018

आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक

                    आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक
आपल्याला निरीगो राहावेसे वाटत असेल तर एक खूप साधा सोपा उपाय आहे.दररोज सकाळी   अर्धा तास चालले पाहिजे हे वाचल्यावर वाटत असेल की अरे  चालण्याने काय होणार आहे पण आयुर्वेदा मध्ये चालण्याला खूप महत्व दिले गेले आहे .दररोज अर्धा तास चालणे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.चालण्याचे बरेच फायदे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले आहेत.त्यातीलच काही उपाय मी आपल्याला सांगणार आहे.तसेच चालताना काय काळजी घ्यावी हे ही मी आपल्याला सांगणार आहे.चला तर सर्वप्रथम चालण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया.
1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8)  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10)  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11)  चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13)  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14)  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16)  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
17)  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18)  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22)  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23)  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24)  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25)  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27)  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28)  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29)  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
30)  नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

दररोज चालण्याचे हे फायदे आहेत.आपण चालताना एक काळजी घेतली पाहिजे दररोज सकाळी शक्य असेल तेवढे लवकर उठून चालले पाहिजे,कारण सकाळच्या हवेमध्ये ओझोन नावाचा वायू असतो व तो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो.तो वायू फक्त   सकाळच्या वतावरणामध्येच असतो व जसा जसा सूर्य निघेल तसा तसा तो निघून जातो.हा वायू  ऑक्सीजन पेक्षा ही जास्त उपयोगी असतो त्यामुळे सकाळी लवकर उठून चालले पाहिजे.चालताना पायात चप्पल नसेल तर त्याचा फायदा आणखी जास्त होतो,आपल्या पायामध्ये अक्युप्रेशर पॉईंट असतात व ते प्रेस होऊन आपल्या शरीराला आणखीनच जास्त फायदा होतो.
तर हे आहेत चालण्याचे फायदे म्हणून दररोज चालले पाहिजे.
    चालण्याने वाढते रे आयुष्य मानसा चाललेची पाहिजे.☺️
ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा.आणि शेअर करा.