23 फ़रवरी 2020

तणावमुक्त जीवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली

तणाव मुक्त जीवन आनंदी जीवन


या धावपळीच्या व धक्काबुक्कीच्या युगात ताणतणाव ही एक मोठी समस्या झाली आहे. मानसिक तणाव घेतल्याने त्याचे शरीराला खूप मोठे दुष्परिणाम सोसावे लागतात.जास्त ताणतणाव घेतल्याने आपल्याला कोणत्या समस्या उद्भवू शकतात व त्यावर उपाय काय हे आपण पाहू.

तनाव कशामुळे येतो व त्याची कारणे-
 तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, अॅसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.

अस्वस्थता, डोकेदुखी, अपस्मार, नाडीची गती वाढणं, छातीत दुखणं, हृदयविकार, श्‍वासाला अडथळा आल्यासारखं वाटणं किंवा श्वास जोरात चालणं, उच्च रक्‍तदाब, जिभेला कोरड पडणं, अपचन, अॅसिडिटी, मूत्राशयावरील नियंत्रण कमी होणं, कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढणे, पाठदुखी, पोटदुखी, उलटी होण्याची भावना, कंबरदुखी, हातापायांना गोळे येणं, रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होणे आदी समस्या उद्धभतात.

तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.

तणाव दूर करण्यासाठी काही सोपे उपाय -

1.रोज सकाळी व्यायाम व योग करावा.
डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे फार गरजेचे आहे.व्यायाम ही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारी एक नैसर्गिक अॅन्टीडिप्रेस्टंट क्रिया आहे.संशोधनात काही लोकांना त्यांच्या आवडीनूसार आठ आठवडे अॅरोबिक्स व्यायाम व नॉन-अॅरोबिक्स व्यायाम आठवड्यातून तीनदा करण्यास सांगण्यात आले.यामुळे त्या लोकांचे डिप्रेशनचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाल्याचे आढळले
2.  8-15 दिवसातून एक तरी सुट्टी घ्यावी.
3.आपल्याला जमेल तेवढेच काम करावे.
4.काम करण्याची पद्धत बदलावी. काम आनंद घेऊन करावे.
5.कुटुंब व लहान मुले यांच्याबरोबर थोडा वेळ घालवावा.
6.रोज सकाळी 20-25 मिनिट चालावे.
7.देवावर श्रद्धा ठेवल्यानेही मानसिक ताण कमी होतो.
8.सकाळी लिंबू सरबत, गुलकंद वैगैरे व रात्री झोपण्याच्या आधी अविपटीकार चूर्ण सेवन करावे.
9.सकाळी ध्यान करावे.
10.नेहमी डोकं शांत ठेवून काम करावे.



आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
        https://arogyaniti.blogspot.com